आज दिनांक पाच जुलै 2025 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजता जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे आरोग्य विभागाकडून व ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरिकांच्या पाणीसाठ्याची निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्यापासून बरेच आजार नागरिकांना भेडसावत असतात त्यामुळे याचा प्रभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर वाघमारे व सरपंच लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे याप्रसंगी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.