पालिकेने वंचितचे कार्यालय तोडल्याने कुर्ला एल विभागासमोरील कुर्ला स्टेशनकडे जाणारा रस्ता वंचितच्या कार्यकर्त्यांनी रोखला
कुर्ला चुनाभट्टी येथे असलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय पालिकेने तोडले होते. या विरोधात आज गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता वंचितच्या कार्यकर्त्यांनी पालिका एल विभागाच्या समोरील कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखला होता. कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यानी पालिकेचे मुख्यद्वार ही तोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमध्ये काही वंचितचे कार्यकर्ते जखमी देखील झाले.