भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांचे मुंबई विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांचे आज बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,मुंबई अध्यक्ष आशिष शेलार,ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार मनोज कोटक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.