Pune MPSC Student Protest : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात रात्री १० वाजताही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत, आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
टाईम्स ऑफ महाराष्ट्रने आंदोलनस्थळी जाऊन गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले. ‘आमच्यावर मिसाईल फेकल्याचे गुन्हे दाखल?’ असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, आंदोलनादरम्यान १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परवानगी रद्द झाल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे, विद्यार्थ्यांकडून आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याची भूमिका मांडली जात आहे.
#MPSC #MPSCAandolan #MPSCStudents #PuneNews #TimesOfMaharashtra StudentProtest MaharashtraNews PuneProtest Brea
Pune City, Pune | Oct 11, 2026