कात्रज नवीन वसाहतीत घराला भीषण आग! अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
पुण्यातील कात्रज नवीन वसाहत परिसरात एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
आगीची माहिती मिळताच कात्रज आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रांतील जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
या मोहिमेत दोन्ही अग्निशमन केंद्रांतील अधिकारी, चालक, फायरमन आणि मदतनीस सहभागी झाले. आगीचे नेमके कारण आणि घराचे किती नुकसान झाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कात्रज घराला आग, कात्रज नवीन वसाहत आग, पुणे अग्नितांडव, पुणे अग्निशमन दल, कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र, Katraj Fire News, Pune Fire Brigade, घराला भीषण आग, पुणे ताज्या बातम्या, Fire Incident Pune
#Katraj #KatrajFire #PuneFire #PuneNews #FireBrigade
Pune City, Pune | Nov 24, 2026