कामठी: : कामठी हादरली,वारिसपुऱ्यात दिवसाढवळ्या महिलेच्या खुनाची धक्कादायक घटना; आरोपी फरार
Kamptee, Nagpur | Jun 26, 2026 कामठी येथील वारिसपुरा शुक्रवारी बाजार परिसरात दिवसाढवळ्या एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका युवकाने या महिलेची गळा चिरून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत महिलेच्या हातावर 'S.M.P.' असे टॅटू गोंदलेले आहे.