पुण्यात Star Bazaar चोरीचा पर्दाफाश! ४ महिला, ३ पुरुषांसह ७ जणांची टोळी अटकेत; ₹7.21 लाखांचा माल जप्त
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील Star Bazaar आउटलेट्समधून महागड्या किराणा मालाची चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. 🚨
अटक केलेल्यांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा माल आणि वाहनांसह एकूण ₹7.21 लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली आहे. 💰
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे एका Innova कारचा माग काढला. त्यानंतर ताथवडे-वाकड परिसरात कार आणि ऑटोरिक्षाचा माग काढत संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत आरोपींनी वाकड, पिंपरी आणि चिखली परिसरातील Star Bazaar आउटलेट्समधील चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचे सांगितले. काजू, बदाम, तूप आणि इतर महागडे खाद्यपदार्थ चोरी केल्याचा आरोप आहे. 👀
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
#Pune #PuneNews #Wakad #PimpriChinchwad #StarBazaar #Theft #CrimeNews #WakadPolice #CCTV #PoliceAction #CrimeInvestigation #Chikhali #Pimpri #Tathawade #BreakingNews #LatestNews #ViralNews #TimesOfMaharashtra