शाहीन-नफिसा यांना कथित मारहाण! FIRच्या मागणीसाठी साकेत पोलीस ठाण्याबाहेर लोकांची गर्दी
दिल्लीतील साकेत पोलीस ठाण्यासमोर दोन महिला पत्रकार, शाहीन खान आणि नफिसा खान यांना कथित मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी लोक जमल्याचे समोर आले आहे. 🚨
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पत्रकारांना कथितरित्या धक्काबुक्की करून पोलीस वाहनात फरफटत नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
तक्रारदारांच्या आरोपानुसार, पोलीस ठाण्यात त्यांच्या धार्मिक ओळखीचा उल्लेख करत धर्मविशिष्ट शिवीगाळ करण्यात आली. या गंभीर आरोपांमुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये शाहीन आणि नफिसा यांच्या शरीरावर जखमा व वळ दिसत असल्याचा दावा केला जात आहे. 👀
या प्रकरणात FIR दाखल होणार का आणि दिल्ली पोलिसांची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.
#ShaheenKhan #NafisaKhan #4PMNews #DelhiPolice #SaketPoliceStation #WomenJournalists #JournalistSafety #PressFreedom #DelhiNews #MinorityRights #MediaNews #JournalistAttack #BreakingNews #LatestNews #TimesOfMaharashtra