कामठी: दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगार जेरबंद
कामठी परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा छडा लावण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाला यश आले आहे. याप्रप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून ९० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे.१८ डिसेंबर २०२५ रोजी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर नगर येथून फिर्यादी नितीन गजभिये यांची अॅक्टिवा चोरीला गेली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता