कामठी: कामठीत गोवंशियांची निर्दयतेने कोंडवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
Kamptee, Nagpur | May 29, 2026 नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली.कामगार नगर येथील आरोपी शेख जावेद याच्या घरासमोर कत्तलीसाठी जनावरे बांधून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी छापा टाकून अत्यंत क्रूरतेने, गर्दीत आणि चारा-पाणी न देता कत्तलीसाठी डांबून ठेवलेली ०५ लहान-मोठी गोवंशीय जनावरे जप्त केली.