सेलू: केळझर येथे क्षुल्लक कारणातून एकाला मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 4, 2024 क्षुल्लक कारणातून व्यक्तीस शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील केळझर येथे ता. 4 सोमवारी सकाळी 8.30 वाजता घडली. याप्रकरणी रूपचंद रामाजी गायकवाड वय 62 रा. केळझर यांनी त्र्यंबक किसना राऊत रा. केळझर याचे विरुद्ध सकाळी 11 वाजता तक्रार दाखल केली. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.