सेलू: टाकळी (किटे) फाट्यावर 2 कारची समोरासमोर धडक, 2 मुली जखमी, जखमी सेवाग्राम रुग्णालयात दाखल
Seloo, Wardha | Nov 4, 2024 विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील दोन मुली जखमी झाल्यात. ही घटना तालुक्यातील टाकळी किटे फाट्यावर ता. 4 सोमवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. वर्धा येथील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते विकास दाडगे हे एम एच 31 एफए 3951 क्रमांकाच्या कारने वर्धेकडून हमदापुरकडे जात होते. तर एमएच 29 बीव्ही 2455 ही कार राळेगाव येथून सेलूकडे जात होती.