सेलू: गोंदापुर येथे शिवीगाळ करत एकास मारहाण, सेलू पोलिसांत आरोपीवर गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Nov 1, 2024 मित्रांसोबत बसून असलेल्या व्यक्तीस एकाने शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना ता. 30 बुधवारी दुपारी 2.30 वाजताचे सुमारास तालुक्यातील गोंदापुर येथे घडली. याप्रकरणी कैलास शंकर चौधरी वय 40 रा. गोंदापुर यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी 6.15 वाजता आरोपी राजू टापरे रा.गोंदापुर याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती ता. 1 नोव्हेंबरला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.