सेलू: टाकळी (किटे) येथे 77 वर्षीय वृद्धेस मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Nov 1, 2024 एका वृद्ध महिलेस शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याची घटना ता. 31 गुरुवाराला सकाळी 9 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील टाकळी किटे येथे घडली. याप्रकरणी श्रीमती लक्ष्मी हरिदास तेलंग वय 77 रा. टाकळी किटे यांनी संजय गेडाम रा. टाकळी किटे याचे विरुद्ध ता. 31 ला दुपारी 2.20 वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती आज ता. 1 नोव्हेंबर शुक्रवारी सेलू पोलिसांकडून मिळाली.