मौदा: अवैधरित्या रेती वाहतुक करणारा टिप्पर कुंभापूर शिवारात मौदा पोलिसांनी पकडला
Mauda, Nagpur | Mar 14, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना पोलीस स्टेशन मौदा हद्दीतील कुंभापूर शिवारात घडली. त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून तपास मौदा पोलिस करीत आहेत.