अक्कलकुवा: अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने मोलगी गावातील मुख्य रस्ता झाला जलमय, रस्ता की नदी समजेना
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गावातील मुख्य रस्ता आज मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जलमय झाला होता. मोलगी गावातील हा मुख्य रस्ता आहे की नदी हे देखील समजेनासे झाले होते. अचानक अवकाळी मुसळधार पावसामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली होती.