अक्कलकुवा: शेल्टापाणी येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, पोलिसांत गुन्हा दाखल
अक्कलकुवा तालुक्यातील शेल्टापाणी येथून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस संशयित इसमाने काहीतरी फुस लावून पळवुन नेले आहे. याबाबत दि. 25 मे रोजी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी मुलीच्या वडिलांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब भगत करीत आहे.