अक्कलकुवा: डाब येथे घरफोडी चांदीचे दागिने लंपास
डाब गावात राहणारे रुंदीबाई वसावे यांच्या घरात चोट्याने अनधिकृतपणे घराचे आत प्रवेश करून रुंदीबाई वसावे हे झोपेत असताना तिच्या हातातील 74 हजार रुपये किमतीचे चांदीचे वाडे व बावठे हे चरून नेले आहे. याबाबत दि. 1 जून रोजी रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी रुंदीबाई वसावे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.