अक्कलकुवा: आ.चंद्रकांत रघुवंशी यांना अक्कलकुवा येथे कार्यक्रमात काळे झेंडे दाखवू, विविध आदिवासी संघटनांचा इशारा
शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा तीन जून रोजी दुपारी अक्कलकुवा येथील सोरापाडा येथे भांडे संच वितरणाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दरम्यान विविध आदिवासी संघटनांच्या वतीने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे पत्र आज पोलीस निरीक्षक अक्कलकुवा यांना विविध आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आले आहे. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.