अक्कलकुवा: अक्कलकुवा शहरातील मक्राणीफळी येथील विविध समस्याने नागरिक त्रस्त; गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन #Jansamasya
अक्कलकुवा ग्रामपंचायत अंतर्गत मक्राणीफळी येथील वार्ड क्रमांक 5 व 6 मध्ये गटारीचे बांधकाम झालेले आहेत परंतु सदर गटारी या ग्रामपंचायत मार्फत साफसफाई होत नसल्याने ओवरफ्लो होत आहे. तसेच कचरा संकलनासाठी घंटागाडी देखील येत नाही याबाबत वारंवार ग्रामपंचायत तोंडी सूचना देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. म्हणून निवेदन देण्यात आले आहे.