कामठी: उनगावात प्रदूषणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; कंपनी बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही सुरू होती कंपनी
Kamptee, Nagpur | May 20, 2026 मिळालेल्या माहितीनुसार सुनील फेरो अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून होत असलेल्या गंभीर प्रदूषणाच्या विरोधात माजी सभापती, जिल्हा परिषद नागपूर अवंतिका लेकुरवाळे यांच्या पुढाकाराने प्रशासनाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत कंपनीचे कामकाज तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.