नागपूर शहर: स्टॉक मार्केट चे प्रशिक्षण देणाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंद्रमणी नगर येथील घटना
31 ऑक्टोबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार , चंद्रमणी नगर येथे स्टॉक मार्केटचे क्लास घेणाऱ्या आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीचे नाव वैभव सेलोकर असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान आपत्ती जनक फोटो काढले असल्याचेही समोर आले आहे. आरोपीचा शोध अजनी पोलीस घेत आहे