परतूर: बस स्थानक परिसरामध्ये नवतरुण गणेश मंडळाच्या वतीने लावण्यात आले महिला सन्मानाचे व स्वच्छतेचे बोर्ड
Partur, Jalna | Sep 20, 2026 आज दिनांक 20 सप्टेंबर 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या नवतरुण गणेश मंडळाच्या बोर्डे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, हे बोर्ड म्हणजे या बोर्डाच्या माध्यमातून महिला सन्मान तसेच पाणी स्वच्छता शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या बाबीकडे या नवतरुण गणेश मंडळांनी लक्ष दिले आहे एकीकडे दुसरे गणेश मंडळ महिलांचे नाचगाणी करण्यात व्यस्त आहे तर या गणेश मंडळाने महिला सन्मान चे बोर्ड लावत सर्वांचे लक्ष वेधले आहे, त्यामुळे या गणेश मंडळाच कौतुक होत आहे.