उमरेड: ४ फरार आरोपींविरुद्ध जाहीरनामा प्रसिद्ध; ३ जूनपर्यंत हजर राहण्याचे आदेश
Umred, Nagpur | May 24, 2026 सुनावणीदरम्यान न्यायालयात सतत गैरहजर राहणाऱ्या ४ आरोपींविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय, नागपूर यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ८२ अन्वये जाहीरनामा काढला आहे. या सर्व आरोपींना ३ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून, तसे न केल्यास त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.