पैठण पोलिसांनी गोदावरी नदी पात्रात जाऊन अवैधरित्या चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन टिप्पर व एक लोडर जप्त केल्याची घटना गुरुवार रोजी घडली आहे दरम्यान एकूण साठ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे महसूल विभागाचे कर्मचारी निवडणूक कार्यात व्यस्त असल्याचे संधी साधून वाळू तस्करांनी गैरफायदा घेत अक्षरशः धुमाकूळ घातला होता दरम्यान पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईत वाळूतस्काराचे धावे दनानले असून पोलिसांनी वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे