महाड: एकनाथ शिंदे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्वः गोगावले
Mahad, Raigad | May 20, 2026 मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रसद पुरवत असल्याचा आरोप केला होता, मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे, तथ्यहीन असल्याचे राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. गोगावले यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या दिशेने काम करत आहेत.