पालघर: तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षा दृष्टिकोनातून 14 मे रोजी रंगीत तालीम;जिल्हाधिकारी कार्यालय येथे पूर्वतयारी बैठक संपन्न
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने 14 मे रोजी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रंगीत तालीम आयोजित करण्यात आली असून या संदर्भात पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेत पूर्वतयारी बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वरिष्ठ सल्लागार मेजर जनरल अजयकुमार वर्मा,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल चंद्रकेतू शर्मा व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.