पालघर: आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते तलासरी येथे धान्य गोदामाचे भूमिपूजन
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तलासरी येथे 1800 मॅट्रिक टन क्षमतेचे धान्य साठवणूक गोदाम उभारण्यात येणार आहे. या गोदामाचे भूमिपूजन विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तलासरीचे तहसीलदार अमोल पाठक, पीडब्ल्यूडी उपकार्यकारी अधिकारी ठाकरे, महसूल अधिकारी, परिसरातील मान्यवर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.