उमरेड: उमरेडमध्ये बनावट कामगार प्रमाणपत्र बनवणारी टोळी गजाआड
Umred, Nagpur | Jun 7, 2026 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नावाने ९० दिवसांच्या कामाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून शासकीय योजनांचा लाभ लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.या प्रकरणी उमरेड पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.