पैठण: पाचोड परिसरातील मुरमा शिवारात चोरट्यांचा धूमाकूळ 30 हून अधिक सौर पंपाच्या केबल नेल्या चोरून
पैठण तालुक्यातील पाचोड परिसरासह विशेषता मुरमा शिवारात अज्ञात चोरट्यांनी गेल्या तीन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे सलग तिसऱ्या दिवशी चोरट्याने सौर ऊर्जा मोटरच्या केबल वर हातसाफ केल्याची घटना घडली आहेत गेल्या 72 तासात तब्बल 30 हून अधिक शेतकऱ्यांच्या सौर पंपाच्या वायर चोरीला गेल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि ती संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरीच्या सत्रामुळे शेतीचे कामे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे सौर ऊर्जा पंपाच्या मुख्य केबल कापून नेल्यामुळे विहिरीतील पाणी उपसणे ठप्प झाले