पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा अक्षरशः महापूर!
शहरभरातून तब्बल 22,809 हरकती नोंदल्या गेल्या असून, याद्यांतील मोठ्या गोंधळामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
सॉफ्टवेअरच्या आधारे विभागणी केल्याचा दावा असला तरी अनेक मतदारांची नावं चुकीच्या प्रभागात, तर काहींची थेट वेगवेगळ्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात नोंद झाल्याचे समोर आले.
सर्वाधिक 6,308 हरकती सिंहगड रोड विभागातून; तर सर्वात कमी 87 हरकती भवानी पेठेत नोंदल्या.
आता या हरकतींची छाननी करून यादी दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान PMC प्रशासनासमोर आहे.
#PuneNews #PMCElection #VoterList #CivicIssues #BreakingNews #PuneUpdates #Election2025 #VoterRights #PuneCity #LocalNews #NewsUpdate #MaharashtraPolitics #MunicipalElections
#punecity #thepublicnews #pmc #punepolitics
Haveli, Pune | Jul 29, 2026