उमरेड: निरव्हा येथे माजी आमदार राजू पारवे यांच्या हस्ते शिवपूजन; दहीकाला उत्सवाने भागवत सप्ताहाची सांगता
Umred, Nagpur | Apr 2, 2026 उमरेड तालुक्यातील निरव्हा येथे आज उत्साहाच्या आणि भक्तीच्या वातावरणात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले. गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्याचा बहुमान राज्याचे माजी आमदार राजू पारवे यांना मिळाला.यावेळी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "शिवाजी महाराजांचे विचार हेच समाज परिवर्तनाचे मुख्य सूत्र आहे," अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.