काटोल: काटोल पोलिसांची कामगिरी: मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड, २ आरोपी अटकेत
Katol, Nagpur | Jun 20, 2026 काटोल येथील शारदा चौकातून फिर्यादी नंदकिशोर चरडे यांची 'हिरो स्पेंडर' मोटार सायकल चोरीला गेली होती. काटोल पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास केला. आशिष मुन्ने आणि रोहित तिरपुरकर (दोन्ही वय २५, रा. सोनोली) या दोन आरोपींना अटक करण्यात आली.