आज दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी मा.पोलीस आयुक्त, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील School of Computational Sciences (संगणक शास्त्र संकुल) व QH फाउंडेशन यांच्या वतीने “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष Cyber Crime Awareness Lecture आयोजित करण्यात आले.
वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री.अविनाश पाटील, महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे, पो.कॉ.अंबलगी यांनी Online Financial Fraud, Phishing, OTP Fraud, UPI Fraud, Social Media Security, Cyber Bullying, Fake Profile, Digital Arrest, AI/Deepfake आधारित फसवणूक, Password Security, Mobile Security, Mule Account तसेच Cyber Crime ची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यशाळेत संगणक शास्त्र विभाग प्रमुख तथा प्राचार्य डॉ. आर. एस. मेन्ते सर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
7 views | Solapur, Maharashtra | Sep 22, 2026