📍लातूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरात वाचनालयाच्या मागणीसाठी प्रतीकात्मक आंदोलन
📍लातूर महानगरपालिकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक परिसरात "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय व सभागृह" उभारण्याच्या मागणीसाठी समाजबांधवांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौर व सभागृह नेते, स्थायी समिती सभापती हे लोकप्रतिनिधी चार तास प्रतीक्षा करूनही उपस्थित न राहिल्याने मातंग समाजाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
यानंतर आंदोलकांनी महापौरांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देत प्रतीकात्मक निषेध नोंदवला. पूर्वी दिलेले आश्वासन कायम ठेवून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने वाचनालय व सभागृह उभारण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, तसेच समाजाच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.
मातंग समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष झाल्यास संविधानाच्या चौकटीत राहून व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Latur, Latur | Aug 4, 2026