उमरेड: पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद; उमरेडमध्ये नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा 'ई-रिक्षा' प्रवास!
Umred, Nagpur | May 15, 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा संदेश देत नागरिकांना आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक किंवा ई-रिक्षाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आज, उमरेड नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींनी एक आदर्श घालून दिला.नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी येताना उमरेड नगरपरिषदेच्या माननीय नगराध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांनी आपल्या खाजगी गाड्यांचा वापर टाळून **ई-रिक्षानी** प्रवास केला.