वडोदऱ्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; सिल्व्हर स्टोन सोसायटीतील फ्लॅटला आग, परिसरात घबराट!
वडोदरा, गुजरात : वडोदऱ्यातील डभोई-वाघोडिया रिंग रोडवरील सिल्व्हर स्टोन अपार्टमेंटमध्ये गॅस सिलिंडरचा शक्तिशाली स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या स्वयंपाकघरात अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाला. या घटनेमुळे संपूर्ण सोसायटीत घबराट पसरली आणि रहिवाशांनी सुरक्षिततेसाठी धावपळ केली.
दरम्यान, सिलिंडरच्या स्फोटाचा आणि त्यानंतर लागलेल्या आगीचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या दुर्घटनेत जीवितहानी किंवा जखमींबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
#Vadodara #CylinderBlast #GujaratNews #FireAccident #BreakingNews
Pune City, Pune | Nov 27, 2026