पाच तासांत वॉल लीक! महापालिकेच्या चुकीची शिक्षा नागरिकांनी का भोगायची?नागरिकांचा संतप्त सवाल
KDMCच्या निकृष्ट दुरुस्तीवर नागरिक संतप्त; पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्ता रोको करू - शिवसेनेचा इशारा
कल्याण पूर्व : जय भवानी नगर, चिंचपाडा येथील शिवम कॉम्प्लेक्सजवळील पाण्याच्या वॉलची KDMCच्या मेंटेनन्स विभागाकडून दुरुस्ती करून अवघे पाच तास उलटत नाहीत तोच पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू झाली आहे. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी या वॉलमधून गळती होत असल्याची तक्रार केल्यानंतर दुरुस्तीसाठी तब्बल दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांनी सहकार्य करत हा त्रास सहन केला. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच पुन्हा गळती सुरू झाल्याने “आम्ही तुमच्या चुकीची शिक्षा किती वेळा भोगायची?” असा संतप्त सवाल शिवसेना कार्यकर्ते दुर्गेश बागुल �
Kalyan, Thane | Oct 7, 2026