सावनेर: आमदार डॉ आशिष देशमुख यांनी नगर परिषद ग्राउंड ची केली पाहणी
Savner, Nagpur | Mar 25, 2026 उद्या श्रीराम नवमी निमित्त विश्वशांतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य विश्वविक्रमी महाआरती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज स्थळाची पाहणी केली. या ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाची रूपरेषा, आराखडा, बैठक व्यवस्था, सुरक्षा तसेच संपूर्ण नियोजनाबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. तसेच आवश्यक सुविधा, शिस्तबद्ध आयोजन आणि प्रत्येक जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली