काटोल: कोंढाळीत उघड्या शोषखड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर संताप
Katol, Nagpur | Apr 28, 2026 शहरात घराबाहेर खेळत असताना उघड्या शोषखड्ड्यात पडून ३ वर्षीय लाभांश कुलदीप चंदनखेडे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.लाभांश घरासमोरील मोकळ्या मैदानात खेळत असताना शेजारील खाजगी भूखंडावरील धोकादायक आणि असुरक्षित शोषखड्ड्यात पडला. श्वास गुदमरल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला तातडीने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.