कामठी: जयस्तंभ चौक येथे अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Kamptee, Nagpur | Apr 16, 2026 पोलीस ठाणे जुने कामठी हद्दीतील जयस्तंभ चौक येथे पन्नास वर्षीय अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे नेले असता त्यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. वाढत्या उन्हाच्या पाऱ्याने त्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे