सुदृढ शरीर… सक्षम पोलीस दल… सुरक्षित नागपूर!
पोलीस दलाची कार्यक्षमता, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक सक्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नागपूर शहर पोलीस मुख्यालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या आधुनिक पोलीस फिटनेस सेंटरचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी नागपूर शहर पोलीस आयुक्त मा. श्री. विश्वास नांगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्याला प्राधान्य देत तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि अधिक सक्षम पोलीस दल घडविण्याच्या दिशेने नागपूर शहर पोलीस दलाचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम!
तंदुरुस्त पोलीस दल… सुरक्षित समाज!
#NagpurCityPolice #PoliceFitness #FitPoliceForce #HealthyPolice #SafeNagpur