बदनापूर: मान देऊळगाव येथे मयत शेतकऱ्याच्या घरी आमदार नारायण कुचे यांनी दिली सांत्वन पर भेट
Badnapur, Jalna | Apr 13, 2026 आज दिनांक 13 एप्रिल 2026वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील मान देऊळगाव येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन्पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी 6 दिवसापूर्वी निधन झालेल्या कडूबाई हिवाळे यांच्या घरी ही भेट देत या हिवाळी परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी सांत्वन पर भेट दिली आहे. याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.