नागपूर शहर: नागपूर हादरले! मद्यधुंद भावाच्या त्रासाला विरोध केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
दारूच्या नशेत आजीला मारहाण करणाऱ्या भावाला समजवण्यास गेलेल्या तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आकाश केशव पटले यांचा मित्र अक्षय प्रकाश शेट्टे याचा भाऊ मयूर प्रकाश शेट्टे हा दारू पिऊन घरी त्यांच्या आजीला मारहाण करत होता. या प्रकारामुळे संतप्त झालेला मयूरचा भाऊ अक्षय शेट्टे, मित्र अंकित जितेद्रसिंग चव्हाण आणि फिर्यादी आकाश पटले हे तिघे मिळून मयूरचा शोध घेत होते.