सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा निषेध; पुण्यात रोहित पवारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोहित पवारांविरोधात आंदोलन करण्यात आले. महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी वैशाली नागवडे यांनी महिलांबद्दल आदर ठेवण्याचे आवाहन करत रोहित पवारांवर टीका केली. 'म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावत असतो,' असे वक्तव्यही त्यांनी केले. सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून पुण्यातील राजकीय वातावरणात हा मुद्दा चर्चेत आला आहे.
Rohit Pawar, Sunetra Pawar, Vaishali Nagawade, NCP Protest Pune, Pune Political News, NCP Women Wing, Maharashtra Politics, Pune Protest, Nationalist Congress Party
#RohitPawar #SunetraPawar #NCP #MaharashtraPolitics #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 27, 2026