काटोल: काटोलमध्ये अवैध गोवंश वाहतूक पकडली; २ आरोपींना अटक, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | May 28, 2026 काटोल पोलिसांनी संत्रा मंडी मार्केट परिसरात सापळा रचून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या दोन संशयित वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत एकूण १० गोवंश जनावरांची क्रूरतेने वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही वाहने आणि जनावरांसह एकूण ११,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.