महाड: पाणीटंचाई, तापमान वाढीस वृक्षतोड कारणीभूत
Mahad, Raigad | May 14, 2026 महाडसह संपुर्ण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली भीषण पाणीटंचाई आणि सतत वाढणारे तापमान हा चिंतेचा विषय बनला असून या गंभीर परिस्थितीमागे मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड हे प्रमुख कारण असल्याचे पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. मागील पाच वर्षांत महाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये उन्हाळा सुरू होताच पाण्याचे संकट तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.