काटोल: कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ११ वा आरोपी अटकेत, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची कार्यवाही
Katol, Nagpur | Apr 19, 2026 नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका कुख्यात टोळीतील ११ व्या आरोपीला, सुमित उर्फ सुमेध दत्तपंत आठवले (वय ५०, राहणार अमरावती) याला अटक केली आहे.आरोपींनी जमिनीखालील गुप्त धन आणि सोन्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून १८ लाख रुपये उकळले होते. त्यानंतर त्यांना बळजबरीने अडवून मारहाण करत रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला होता. या प्रकरणातील १० आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ११ व्या आरोपीला अमरावतीतून ताब्यात घेण्यात आले