रामटेक: फ्रेंड्स फोरेवर मंडळाद्वारे रामटेक येथे विविध सांस्कृतिक स्पर्धा संपन्न
Ramtek, Nagpur | Mar 16, 2026 फ्रेंड्स फोरेवर मंडळाद्वारे स्व. घनश्यामराव किंमतकर स्मृती सभागृह रामटेक येथे महिलांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आठ मार्चला मंडळाद्वारे शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यानंतर 16 मार्चला महिलांसाठी डान्स, रॅम्प वॉक,, रामटेक ब्युटी क्वीन,लघु नाटिका, गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यात महिलांनी उत्साहाने सहभाग घेऊन पुरस्कार जिंकले.