महाड: बारावी निकालात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक
Mahad, Raigad | May 4, 2026 फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शनिवार 2 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. रायगड जिल्ह्याचा एकूण निकाल 93 टक्के लागला असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगीरी केली आहे. तालुक्यांच्या निकालात तळा 96.69, कर्जत 96.31, म्हसळा 96.31, पनवेल 94.73, अलिबाग 95.39, पेण 93.94, रोहा 94.29, उरण 94.03, महाड 92.73, माणगाव 93.51, पोलादपूर 88.84, सुधागड 88.44, मुरूड 88.46 आणि खालापूर तालुक्याचा निकाल 85.02 टक्के लागला आहे.